Saturday 19 November 2011

समुद्र किनारी......


  नेहमी  वाटायचं  मला  तुझ्या  सोबत               
  समुद्र  किनारी  बसून ...
  बुडणारा  सूर्य  बघावा 
  त्या  सुंदरश्या    कातर  वेळी 
  काहीच  न  बोलताही ...
  तुझ्या  माझ्यात  संवाद   घडावा  

Saturday 5 November 2011

मनाच्या तळाशी...


मनाच्या तळाशी..खोल गहिऱ्या पाण्यात


तुझ्या आठवणींचे क्षण...विसावलेले    


छेडता तारा  मनाच्या  कुणी


मला छळावयास..  सरावलेले